दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दया – आमदार प्रकाश गजभिये

Advertisement
MLC Prakash Gajbhiye

File Pic

नागपूर: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दयावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेमध्ये नियम १०२ अन्वये केली.

मुंबईच्या दादरठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव होतेच शिवाय त्यांचे स्मारकही आहे. दादर येथील चैत्यभूमीवर देशासह राज्यभरातील आंबेडकरी जनता दर्शनासाठी येत असते. याशिवाय त्यांचे राजगृहही दादरमध्येच आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चिरंतर स्मरणात रहावे यासाठी दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दयावे अशी मागणी राज्यातील सर्व अनुयायांची फार पूर्वीपासून आहे. मात्र ही मागणी अदयापही मान्य न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे या रेल्वेस्थानकाला त्वरीत महामानवाचे नाव देण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करावी अशा ठरावाची सूचना आमदार प्रकाश गजभिये यांनी प्रधान सचिवांकडे मांडली.