Published On : Wed, Dec 6th, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन,चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

Advertisement

मुंबई -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर मोठा भीमसागर उसळला आहे.

सकाळपासूनच चैत्यभूमीच्या परिसरात देशभरातून आंबेडकरी जनता आणि भीमानुयायींनी गर्दी केली आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने विशेष कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे

दरम्यान बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुता ही जी भगवान गौतम बुद्धांनी सांगितेलली तत्वे आहेत, या तत्त्वांच्या आधारे संविधान तयार केलं. म्हणूनच जगामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी आपल्या जीवनात अर्थतज्ज्ञ, मजूर मंत्री, पाटबंधारे मंत्री म्हणून काम केलं. प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल ठरलं आहे.

म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. तज्ज्ञांचे विचार जिथे संपतात तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे. म्हणूनच आज देशाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत