Published On : Mon, Jun 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पत्नीच्या चारित्र्यावर संशय;नागपुरात पोलिसाने केली आत्महत्या

Advertisement

नागपूर : पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी गिट्टीखदान, पोलीस वसाहतीत उघडकीस आली. विजय चवरे (३८) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विजय हा मुळचा चंद्रपूरचा असून त्याला पत्नी रेणुका, एक दहा वर्षाचा मुलगा व आठ वर्षांची मुलगी आहे.

मागील वर्षभऱ्यापासून तो हिंगणा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पत्नी रेणुका (३६) ही कोराडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर आहे. विजय हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचा. शनिवारी तो सकाळी कर्तव्यावर गेला. नंतर दुपारी घरी परतला. तेव्हा त्याची पत्नी बाजारात गेली होती. याच रागातून चवरे यांनी टोकाचे पाऊल उचलले.

पत्नी घरी आल्यानंतर विजय हा दोरी सिलींग फॅनला बांधून गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्याला तत्काळ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर तर विजयचे पार्थिव त्याच्या मूळ गावी म्हणजे चंद्रपूरला रवाना करण्यात आले.या प्रकरणी गिट्टीखदाना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.