Published On : Fri, Feb 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील वाठोडा येथे आर्थिक वादातून दुहेरी हत्या !

नागपूर : आर्थिक वादातून हल्लेखोरांच्या एका गटाने दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे खरबी परिसरात घडली. कृष्णकांत भट आणि सनी सरुडकर अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आरोपी किरण शेंडे यांचे मित्र असल्याची माहिती वाठोडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी नागपूर टुडेला दिली.

सनीने किरणला ईएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती. मात्र, किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्याने, सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले. त्यामुळे खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका चिघळला की आरोपी किरणने दगड आणि काठ्यांनी दोघांवर हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भादंवि कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींचा शोध सुरू आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement