Published On : Wed, Nov 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका,हेच आमचे म्हणणे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी

Advertisement

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध नाही. परंतू, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली. तसेच जरांगे पाटलांचे आरोप निराधार असून नुसत्या कुणबी जातीचा शोध न घेता ओबीसी समाजातील सर्व ४०० जातींचा शोध घ्यावा, अशी मागणी मी सरकारकडे केली होती, असेही ते म्हणाले.

सरकार मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र सरकार देऊ शकत नाही. ज्या जातींचा आधीच ओबीसीमध्ये समावेश आहे, त्या जातीचा अभ्यास करण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला आहे का? नवीन जात ॲड करण्याचा अधिकार आहे का? अशा प्रश्नांची सरबत्तीही तायवाडे यांनी केली.

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी,अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी पुढाकार घेतला.हारमध्ये एससी, एसटी ओबीसी मिळून यांची संख्या 75 टक्के असल्याने त्यांना 65 टक्के आरक्षण देण्यासाठी सुधारणा नितेश कुमार त्यांच्या राज्यात करत असल्याचे तायवाडे म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.