
नागपूर : देशभरात दिवाळी सणाचा उत्साह आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी होईल तर काही लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी १ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी होईल.
दिवाळी कधी आहे?
दिवाळी दरवर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. या वर्षी अमावस्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून १२ मिनिटापासून सुरू होत आहे, जी १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटापर्यंत चालेल. उदया तिथी प्रत्येक व्रत किंवा सणात पाळली जाते परंतु प्रदोष काळ हा दिवाळीच्या सणात महत्वाचा मानला जातो. दिवाळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर दिवे लावण्याची परंपरा आहे. १ नोव्हेंबरला अमावस्या तिथी संध्याकाळीच संपेल, त्यामुळे प्रदोष काळ प्राप्त होणार नाही. या कारणास्तव, ३१ ऑक्टोबर रोजीच दिवाळीचा सण साजरा करणे चांगले होईल.
दिवाळी पूजन शुभ मुहूर्त –
प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते. प्रदोष काळ संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटे ते ८ वाजून ११ मिनिटापर्यंत राहील. वृषभ काळ संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटे ते ८ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. या काळातच लक्ष्मीची पूजा करता येते.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




