Published On : Mon, Aug 30th, 2021

दिव्यांग खेळाडूंना ना. गडकरींच्या हस्ते आर्चरी किट प्रदान

नागपूर : राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून मनपा समाज विकास विभागाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चरी किट देऊन सन्मानित करण्यात आले.

संदीप गवई आणि आशीष ठावरे ही या दोन दिव्यांग खेळाडूंची नावे आहेत. विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मनपा सतत खेळाडूंना मदत करीत असते. याच मालिकेत आज क्रीडादिनी हा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, क्रीडा सभापती प्रमोद तभाने, उपायुक्त राजेश भगत, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर उपस्थित होते.