Published On : Wed, Mar 25th, 2020

संचार बंदित विनाकारण बाहेर पडणायांवर कठोर कारवाई करणार :जिल्हाधिकारी दीपक सिंगला

Advertisement

– आता बाहेरून जिल्हयात आलेले सर्वच निरीक्षणाखाली

गडचिरोली: संचार बंदी लागू करूनही विनाकारण बाहेर पडणा-यांची संख्या निदर्शनास येत आहे. यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेला कठोर पाऊले उचलावी लागतील तसेच संबंधितावर कडक कारवाई करावीच लागेल अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी तहसिलदारांना व्हीसी द्वारे दिल्या आहेत.

अकारण कोणताही व्यक्ती अथवा वाहने रस्त्यावर नको आहेत. संचार बंदीनंतरही कोणी ऐकत नसेल तर पोलीसांना व प्रशासनाला कारवाई करण्याची तरतूद कलम 144 तसेच साथरोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आहे. करोना संसर्गाच्या धर्तीवर फक्त आवश्यक सेवांसाठी फिरण्याची परवानगी असताना काही नागरिक अकारण फिरत असतील तर त्यांनी या संसर्गाची गांभीयर्ता लक्षात आणून देणे गरजेचे आहे. स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे ही अपेक्षा आहे. अशांना जिल्हाधिकारी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे घरात राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आज तहसिलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्त झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. विजय राठोड, अति. पोलीस अधीक्षक मोहित गर्ग आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

करोना संसर्ग साखळीतील आताची परिसिथती निर्णायक स्तरावर आलेली असताना नागरीकांनी याबाबत गांर्भियाने संसर्ग साखळी समजून घेणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. जिल्हयातील परिस्थिती चांगली असताना आता आपण सहकार्य केले नाही तर प्रशासन किंवा पोलीस तसेच आरोग्य विभागही संसर्ग रोखू शकणार नाही. कारण जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवांवरून फक्त आणि फक्त नागरीकच ही संसर्ग साखळी तोडू शकतात हा अनुभव आहे. या प्रक्रियेत कोणी अडचण निर्माण करून संसर्गास चालना देत असेल तर त्यासाठी प्रशासन जनतेच्या हितासाठी कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असे यावेळी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. गावस्तरावर पोलीस पाटिल तसेच गा्रम पाटिल यांची मदतही घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

नागरीकांनी प्रशासनाच्या सूचना, पोलीसांचे आदेश तर आरोग्य विभागाची माहिती आत्मसात करा* : जनेतेच्या हितीसाठी करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन वेळोवेळी आवश्यक सूचना देत आहे, त्याचे पालन जनतेकडून होणे गरजेचे आहे. पोलीस विभागही संचार बंदीच्या अनुषंगाने महत्वाचे योगदान रस्त्यावर उभे राहून देत आहेत, त्यांना नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अकारण फिरणा-यांवर ते आवश्यक कारवाई करतच राहतील. तसेच सर्वात महत्वाचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्यविषयक काळजी घ्या. करोना संसर्ग होवू नये म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. यावेळी अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही स्थितीत चुकीचे उपचार घेवू नका. तसेच आरोग्याच्या काळजीबाबत व संसर्ग होवू नये म्हणून दिलेली अचूक माहितीच आत्मसात करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

घरीच क्वारंटाईनमध्ये राहणे सोपे नसले तरी ते अनिवार्यच* : करोना बाधित प्रदेशातून आलेल्यांना जिल्हयात घरीच क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुर्ण १४ दिवस एकटयाने राहणे आवघड असले तरी ते अनिवार्य आहे. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या लोकांनी बाहेर येणे चुकीचे आहे. आता प्रशासन या सूचनांचे पालन न केलेल्या व्यक्तींना शासकीय रूग्णालयात सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी कार्य करत आहे. सद्या महाराष्ट्र स्टेज ३ कडे वाटचाल करत आहे. सामाजिक अंतर कमी केले तरच करोना संसर्ग टाळता येणार आहे. त्यासाठी क्वारंटाईन मधील लोकांनी कोणत्याही सूचनांकडे दुर्लक्ष करू नये असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सद्या परदेशातून आलेल्या 17 लोकांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कालच्या उर्वरीत दोन लोकांचे नमुने आले असून तेही निगेटीव्ह आले आहेत.

आपली जीवनावश्यक कामे कशी करावीत* : सर्वत्र संचार बंदी आहे मग जीवनावश्यक कामे कशी करावीत यासाठी विचारणा होत आहे. राज्य शासनाकडून दि.२३ मार्च रोजी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही आरोग्यविषयक आपतकालीन स्थितीत खाजगी वाहतूकीला परवानगी आहे. मात्र त्यांचे बरोबर दोन व्यक्तींना फिरण्यास परवानगी आहे. तसेच आवश्यक किराणा व इतर बाबी खरेदी करण्यासाठी चालक व त्याबरोबर एक व्यक्तीला सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक फिरणा-या नागरीकांनी फिरत असल्याबाबतचे कारण शासनाने सूट दिलेल्या कारणांपैकी असावे. संचार बंदीमध्ये सूट दिलेल्या ठिाकणी करोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीतील सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्या ठिकाणी गर्दी न होवू देणे, स्वच्छता राखणे, हात धुण्याची व्यवस्था करणे अशा बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.

माध्यम प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र आवश्यक* : माध्यम प्रतिनिधींनी आपल्या कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत ओळखपत्र बरोबर ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी गटाने अजिबात फिरू नये. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

बाहेरून आलेले सर्वच नागरीकांना निरीक्षणात ठेवण्यात येणार* : गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 24 मार्च रोजी 17 प्रवासी घरच्या घरी अलगीकरणात असून त्यांचा नियमित पाठपूरावा सुरु आहे. आजतागायत 36 प्रवाशांना घरच्या घरी अलगीकरणाकरीता नोंदणीकृत केले आहे. सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील विलगिकरण कक्षात दिनांक 16 मार्च 2020 पासून आज पर्यंत 9 प्रवाशांना भरती करण्यात आलेले होते. त्यापैकी 9 जणांचे प्रयोगशाळा नमूने करोना करीता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. जिल्ह्यात 20 मार्च 2020 पासून परदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात आज रोजीपर्यंत 5950 प्रवाशांची नोंद करण्यात आलेली आहे. यात दररोल आकडेवारीत वाढ होत आहे.

आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरीकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार आहे.
दिनांक 24 मार्च पासून शासकीय कर्मचारी व आशा यांचे मार्फत घरोघरी जावून त्या प्रवाशांच्या घरावर स्टीकर लावणे व त्यांच्या डाव्या हाताच्या उलटया भागावर शिक्का मारण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. आशा मार्फत सदर प्रवाशांच्या घरी भेटी देवून पुढील 14 दिवस पाठपूरावा करण्यात येईल. यासाठी त्या नागरीकांनी सहयोग करावा. अन्यथा त्यांना सक्तीने शासकीय क्वारंटाईन कक्षात हलविण्यात येणार आहे. *सद्य:परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात आजतागायता नविन करोना विषाणू (कोविड-19) चा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही.*