Published On : Sat, Jul 21st, 2018

पुलक जनचेतना मंच व्दारे गरजु विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

Advertisement

कन्हान : – स्थानिय बळीरामजी दखने हायस्कुल येथे ” पुलक जनचेतना मंच” महाल नागपुर यांच्या तर्फे शाळेतील इयत्ता १० वी च्या गरजु विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले . व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .

बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे ” पुलक जनचेतना मंच महाल नागपुर ” च्या वतीने छोटेखानी कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी विठोबा दंत मंजन, नागपुर चे संचालक कार्तिक शेंडे , पुलक मंच कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र गडेकर, महाल शाखा अध्यक्ष मनोज मांडवगडे, राष्ट्रीय संयुक्त महामंत्री आशिष इंदाने , देवेंद्र उमाठे , प्रशांत कहाते , डॉ दिपक शेंडेकर, महेंद्र नवलाखे , सौ जया गडेकर, नयना उमाठे, सविता मांडवगडे आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेऊन मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या इयत्ता १० वी च्या गरजु विद्यार्थ्यांना ” पुलक जनचेतना मंचच्या वतीने पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले .

तद्नंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ भाग्यश्री नखाते हयानी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका गौतमी गजभिये हयानी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ञानप्रकाश यादव, सचिव अल्लडवार, दिलीप धनविजय, अमित थटेरे व शिक्षक वृंदानी परिश्रम घेऊन सहकार्य केले .