नागपूर : राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून त्या योजनांचा लाभ देण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ प्रयत्नशील आहे. या योजनेच्या माध्यमातून नागपुरात ठिकठिकाणी शासनाकडून कामगारांना गृहपयोगी वस्तूंच्या संचासह सेफ्टी किटचे वितरण करण्यात येत आहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या या गृहपयोगी वस्तूंच्या संचामध्ये आणि सेफ्टी किटमध्ये नेमके काय आहे यावर प्रकाश टाकला. कामगारांचा सामाजिक स्तर उंचावावा हा शासनाचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात असंघटीत बांधकाम कामगार यांच्या संख्या खूप आहे. प्रत्येक स्तरावर बांधकाम कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी कामगार कल्याणकारी मंडळ तत्पर असते. महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू आणि सेफ्टी किट वितारीत करण्याची नवीन योजना मंडळाने अमलात आणली आहे. बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना काय आहे, हे जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कोणते सेफ्टी साहित्य मिळते?
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत बांधकाम कामगार मंडळामार्फत राज्यभरात पेटी वाटपाचे कार्यक्रम होत असतात. या पेटीत खालील वस्तू समाविष्ट असतात.बॅग, रिफ्लेक्टर जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, चार कप्प्याच्या जेवणाचा डबा, सेफ्टी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर पाण्याची बॉटल ,मच्छरदाणी, जाळी, सेफ्टी बूट, हात मोजे, चटई इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. गृहपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश –
ताट ,वाटया,पाण्याचे ग्लास,पातेले झाकणासह, मोठा चमचा (भात वाटपाकरीता),पाण्याचा जग (2 लीटर),मसाला डब्बा (7 भाग),डब्बा झाकणासह (14 इंच),डब्बा झाकणासह (16 इंच),डब्बा झाकणासह (18 इंच),प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील),कढई (स्टील),स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह एकूण 30 भांडी देण्यात येत आहे.