Published On : Wed, Jul 31st, 2019

155 शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण

कामठी : शालेय शिक्षण घेत असताना कुणीही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये यासाठी येथील बहुजण लोकनायकांनी पुढाकाराची भावना घेत कामठी तालुक्यातील आसलवाडा जिल्हा प्राथमिक शाळा , अंगणवाडी तसेच रांनमांगली ,बोरगाव, चिकना, भामेवाडा या जी प प्राथमिक शाळेतील 155 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मोठाई वितरण करण्यात आले.

हे मोफत गनवेश बुलढाना अर्बन बँक शाखा नागपूर चे व्यवस्थापक संजय राठी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले याप्रसंगी बहुजन लोकनायक माजी सरपंच अमोल खोडके, आसलवाडा ग्रा प चे उपसरपंच अर्जुन राऊत,केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुधे, दिलीप जैन, कमल पटेल, लालचंद महादूले, बाबूजी अवजाळे, साहारिया, वंशपाल ठाकूर, सुनील कावळे, दिलीप चकोले, प्रकाश नौकरकर, यांच्या सौजण्यातून विद्यार्थ्यांना हे गणवेश व मिठाई वितरीत करण्यात आले असून प्रामुख्याने उपस्थित होते तसेच भामेवाडा ग्रा प सरपंच कविताबाई बांगडे, सुरेशराव बांगडे, दिनकररराव येंडे, विनायकराव गायधने, जागेश्वर शेंडे, गनेश वानखेडे, रवी वानखेडे, यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रामटेके तर आभार प्रदर्शन शिक्षक बोकडे यांनी मानले दरम्यान या मोफत गणवेश साठी मोलाची भूमिका साकारणाऱ्या समस्त बहुजन लोकनायकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शालेय शिक्षकगण तसेच विद्यार्थिवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.