Published On : Thu, Apr 9th, 2020

हावितरण कामठी उपविभागाकडून ३०० गरजुंना धान्य वाटप

Advertisement

नागपूर: कोरोना विष्णूचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना नागरिकांना अखण्डित वीज पुरवठ्यासोबतच महावितरणकडून गरजू आणि गरिबांसाठी दातृत्वाचा हात समोर करण्यात आला आहे. महावितरणच्या कामठी उपविभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून शहरातील सुमारे ३०० गरजूना अन्न- धान्य वाटप करून आपल्या सामाजिक भावनेचा परिचय करून दिला.

मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी यासाठी पुढाकार घेतला. महावितरणच्या ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात कामठी शहरातील गरजू व्यक्तींना एकत्रित करण्यात आले. मदत वाटप करतेवेळी “सोशल डिस्टन्स” पद्धतीचा पूर्णपणे अवलंब करण्यात आला. यात आटा, तांदूळ. डाळ. तेल,साबण आदी वस्तूंचा समावेश आहे.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यासाठी सहायक अभियंता यशवंत भैसारे, नितीन घुबे, विभव नासरे, अमोल भांडेवार, मनोज मानमोडे यांच्यासह महावितरण कामठी उपविभागातील जनमित्र, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.