Published On : Fri, Apr 3rd, 2020

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंती पर्वावर रामटेक शहरात अन्न धान्य व भाजीपाला वाटप

Advertisement

परमात्मा एक आनंदधाम ने दिला मानवतेचा परिचय

रामटेक -येथील परमात्मा एक आनंदधामच्या वतीने गुरुवार, २ एप्रिल २0२0 ला भगवानबाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंती पर्वावर रामटेक शहरात अन्न धान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशात कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यास रामटेक शहरवाशी व परिसरात सहकार्य मिळत आहे. त्यामुळे गरीब मजूर घराबाहेर न पडल्यामुळे अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला आहे. त्यासाठी परमात्मा एक आनंदधामच्या वतीने मदतीचा हात पुढे करून रामटेकच्या जवळपास असणारे खेडेगाव गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सतत अन्यधान्य व भाजीपाला वाटप सुरू आहेत.

यात परमपूज्य परमात्मा एक आनंदधाम रामटेकच्या वतीने लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या नेतृत्वात आनंदधामचे (अध्यक्ष) बजरंग मेहर यांचे हस्ते व रामटेकमध्ये लहानगढ पायरी येथे पोलिस निरिक्षक दिलीप ठाकूर यांच्या उपस्थित गोर-गरिबांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ तसेच हिरवा भाजीपाला व नगदी रक्कमसुद्धा देण्यात आली.

जगभर कोरोना हा रोग वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन १४ एप्रिल २0२0 पर्यंत २१ दिवसांचा ठरविला आहे. म्हणून गोरगरिबांची मजुरीही बंद झाली आहे. तर काही मजूर मधातच अडकले आहेत. त्यांना शासनानेसुद्धा रेशन मोफत देण्याचे ठरविले आहे. अन्य धान्य वाटप करण्याचे काम या परमात्मा एक आनंदधानतर्फे मेहर बाबूजी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आनंदधामचे अध्यक्ष बजरंग मेहर, प्रभुनाथ कोहपरे, जगदीश नाकाडे, सुरेश कारसरपे यांनी सहकार्य केले

Advertisement
Advertisement