Published On : Sat, Jul 27th, 2019

गरजवंत विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे वितरण

Advertisement

कन्हान : – येथील विकास प्राथमिक शाळेत आज (दि.२६) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्टच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार वरुण सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, तालुका संघटक भीमराव शिंदेमेश्राम उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करुन त्यांना खंबीरपणे उभे राहण्याचे पाठबळ या सामाजिक उपक्रमातून होत असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार सहारे यांनी व्यक्त केले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी १६ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत बोंदरे यांनी तर आभार देवेंद्र सेंगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय तिमांडे, श्रीरंग बोरकर, शरद डोकरीमारे, श्रीमती सुनंदा बारई यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.