Published On : Thu, Sep 24th, 2020

नागपूर महानगरपालिकेचा विस्कळीत कारभार – सुनील मेश्राम

नागपूर : अन्याय-अत्याचार प्रतिकार संघटनेच्या वतीने मनपा एकीकडे तिच्या नियंत्रण नियोजन करिता होत असून दुसरीकडे विविध विभागातील पडलेले जन सामान्यांचे कार्य येथील कर्मचारी व अधिकारी त्यांच्या निष्काळजी पणामुळे पूर्णपणे रखडलेले आहेत. नागपुरातील पीडीत व सामान्य लोकांच्या आलेल्या तक्रारी सुनील मेश्राम यांच्याकडे आल्या असून मनपाचे नगर रचना विभाग अंतर्गत संपत्तीचे डिमांड नोटसाठी लागणारे फार्म मागील दोन महिन्यापासून नगर रचना संचालक श्री.गावंडे यांच्या आदेशानुसार कोणतीही ठोस कारण नसून सुद्धा नागरिकांना देणे बंद केलेले आहे.

दररोज मोठ्या संख्येने नागरिक फॉर्म करिता मनपात चकरा मारत आहे. परंतु त्यांना तारीख देऊन परत पाठविण्यात येते. नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कार्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांना भेटण्यास गेलो असता, त्यांचे पीएनी सांगितले की, साहेब भेटू शकत नाही, तुमच्या समस्येचे निवारण होऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचे आहे ते करा, न्युज पेपर ला प्रकाशित करायचे असेल तर करा, अशा उध्दट भाषेत बेजबाबदार पणे त्यांचे पीए बोलले. याच विभागातील कनिष्ठ अभियंता श्री. भुरे यांच्याकडे एक गरीब महिला आपल्या कामाकरिता गेली असता, भुरे यांनी त्या महिले सोबत अतिशय गैरवर्तणूक करून अपमानित केले. त्या महिलेने भुरे यांच्या विरुद्ध सदर पोलिस स्टेशनला तक्रार सुद्धा केलेली आहे. परंतु त्याचा काही परिणाम झालेला नाही. अशा प्रकारचा कारभार मनपाच्या प्रत्येक विभागात सुरू आहे.

पूर्वीचे आयुक्त मा. तुकाराम मुंढे साहेब असताना मनपा मध्ये कित्येक बद्दल व नियमाप्रमाणे काम होत असे. परंतु ते गेल्यापासून तेथील कर्मचारी व अधिकारी मनमर्जी पणे वागत असून कार्यालयात कधी येतात. कधी येत नाही. व पैशासाठी सामान्य नागरिकांचे काम जाणीवपूर्वक थांबवून ठेवतात.

विनाकारण लोकांना त्रास देतात. अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आहे. परंतु याकडे मनपा दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच मनपा मध्ये महापालिकेचा विस्कळीत कारभार निर्माण झालेला आहे. मनपा मध्ये कर्मचारी मनमानी काम करत आहे, कुणाचाही दबाव नाही. यांची दखल घ्यावी. अन्याय-अत्याचार प्रतिकार संघटनेचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.