Published On : Mon, Jul 3rd, 2017

लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा – सचिन कुर्वे

Advertisement

Lokshahi Din
नागपूर:
सामान्य जनतेकडून लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या तक्रारी व गऱ्हाणी संदर्भात केलेल्या कारवाहीची माहिती संबंधित तक्रारदारांना तात्काळ मिळणे अपेक्षित आहे. लोकशाही दिनातील प्रत्येक नागरिकांच्या तक्रारी संदर्भात विभाग प्रमुखाने केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारांना देण्यात यावी तसेच प्रलंबित असलेल्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.

लोकशाही दिनानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी लोकशाही दिनात दाखल झालेल्या व त्यावर विभागप्रमुखांकडून केलेल्या कार्यवाही संदर्भात आढावा घेतला. भूमिअभिलेख, सहकार, जिल्हा परिषद, महसूल आदी विभागांकडे असलेलया प्रलंबित तक्रारी संदर्भात तात्काळ कार्यवाही करुन संबंधित तक्रारदारांना केलेल्या कार्यवाही संदर्भात कळविण्यात यावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा लोकशाही दिनात जनतेच्या गऱ्हाणी व तक्रारी स्विकारण्यात आल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी तक्रारीत स्विकारल्यात. यावेळी 11 नागरिकांनी लोकशाही दिनात आपले गऱ्हाणी मांडली. यावेळी विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा लोकशाही दिनात भूमिअभिलेख कार्यालयासंदर्भात जमिनीची मोजणी, तसेच वन विभाग, महसूल विभागासंदर्भात नझूलची लिज वाढूण देणे, घरकुल यादी नाव समाविष्ट करणे, खैकरा नाला प्रकल्पामुळे होणारे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी पादचारे तयार करावे आदी तक्रारी यावेळी दाखल झाल्यात. तक्रारी संदर्भात एक महिन्यात निर्णय घ्यावेत अशा सूचनाही संबंधित विभागांना यावेळी देण्यात आल्यात.