Published On : Fri, Jul 20th, 2018

२३/१० व जुन्या पेन्शनसाठी शिक्षण व ग्रामविकास सचिवांसोबत चर्चा

कन्हान : – राज्यातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या २३/१० च्या काळा अध्यादेश विरोधात व जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. १९) विधानभवनात दुपारी चार वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अर्थ राज्यमंत्री केसरकर, ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांची विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधान भवनात आले असल्यामुळे आमची कोणत्याही मंत्री महोदयासोबत भेट व चर्चा झाली नाही. नाउमेद न होता आम्ही शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव संजय माने, ग्रामविकास विभागाचे अवर सचिव नितीन भालेराव यांना त्यांच्या दालनात भेटून २३/१० च्या काळा अध्यादेश विरोधात व जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मागण्यांचे निवेदन देवून चर्चा केली.

या शिष्टमंडळात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, लढवय्ये शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सर, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव खिमेश बढिये, शहर संघटक समीर काळे, राज्य खासगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष महेश गिरी यांचा समावेश होता.