Published On : Tue, Oct 10th, 2017

मल्टीमोडल हब, लंडन स्ट्रीटवर दटके समितीच्या बैठकीत चर्चा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लंडन स्ट्रीट, बिग हॉस्पीटल, मल्टीमोडल हब आणि साई या प्रकल्पांना वेग देण्यासंदर्भात मंगळवारी (ता. १०) दटके समितीची बैठक मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात पार पडली. बैठकीत संबंधित सर्व प्रकल्पांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला दटके समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके, समितीचे निमंत्रित सदस्य स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, समितीचे सदस्य पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. रिजवान सिद्दीकी, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी लंडन स्ट्रीट संदर्भात ज्या काही अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी अधिकाऱ्यांना दिले. बिग दवाखान्या सुधारीत आराखडा तयार झाला असून त्यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती श्री. दटके यांनी दिली. रेल्वे स्थानकाच्या कॉटन मार्केट गेटच्या बाजूने मल्टीमोडल हब प्रस्तावित असून त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या सादरीकरणावर समितीने प्रशासनाशी चर्चा केली. साई प्रकल्पासाठी प्रस्तावित जमिनीवर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.