Advertisement
नागपूर: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला पुर्णतः दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आणि समाजवादी पार्टीने केला आहे. नागपुरात दोन्ही पक्षांनी याचा निषेध करत आंदोलन केले.
अर्थसंकल्पातून सर्वाधिक कर भरणाऱ्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काहीतरी मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र तसे काहीच झाले नाही.
यावरून केंद्र सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बुधवारी शहरात निदर्शने केली.
राष्ट्रवादी-सपा कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.