Published On : Sat, Oct 3rd, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 24 रूग्णांना डिस्चार्ज

Advertisement

139 कोरोना पॉझिटिव्ह
·बरे झालेले रुग्ण 3802
·पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 5728
·क्रियाशील रुग्ण 1800
·आज 02 मृत्यू
·एकूण मृत्यू 126

भंडारा : जिल्ह्यात आज 1015 व्यक्तींचा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीत आले असून त्यापैकी 139 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 46 हजार 585 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 5728 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3802 झाली असून आज 139 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5728 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.37 टक्के आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 77, साकोली 15, लाखांदूर 00, तुमसर 08, मोहाडी 13, पवनी 17 व लाखनी तालुक्यातील 09 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 3802 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 5728 झाली असून 1800 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 126 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2964, साकोली – 427, लाखांदुर- 243, तुमसर- 512, मोहाडी- 536, पवनी- 511 व लाखनी- 535 असे एकूण 5728 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 3802 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.37 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.19 टक्के एवढा आहे.

आज 02 ऑक्टोबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 111 व्यक्ती भरती असून 2206 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.