गणेशोत्सव व मोहरम च्या पर्वावर पोलिसांनी केला पायदळ रूट मार्च
कामठी :-, मोहरम ताजिया मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने पथसंचालन करीत पायदळ रूट मार्च करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त नीलोत्पल ,सहायक पोलिस आयुक्त राजेश परदेशी ,नवीन कामठी चे ठाणेदार संतोष बाकल, जुनी कामठीचे ठाणेदार देविदास कठाळे यांच्या उपस्थितीत नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या प्रांगणातून पायदळ रुट मार्चला सुरुवात करण्यात आली .
हे रूट मार्च पोलीस लाईन ,इस्माईल पुरा ,येरखेडा दुर्गा चौक ,रामकृष्ण लेआउट ,खुशबू मोटर , जय भीम चौक, गवळीपुरा, लकडगंज ,जयस्तंभ चौक ,गोयल टाकीज चौक ,शुक्रवारी बाजार ,गांधी चौक ,पोरवाल चौक सत्यनारायण चौक फुल ओली चौक , लाला ओली चौक ,भाजी मंडी ,बोरकर चौक नेताजी चौक, मेन रोड ,जुने पोलीस स्टेशन चौक मोटर स्टँड चौक जयस्तंभ चौक नगर भ्रमण करीत नवीन कामठी पोलिस ठाण्यात रूट मार्चचे समापन करण्यात आले.या रूट मार्चमध्ये राज्य राखीव दलाची एक तुकडी ,नवीन कामठी व जुनी कामठी ठाण्यातील पोलीस कर्मचारी , वाहतूक पोलीस , एक हजार होमगार्ड सह चारशे पोलिसांनी पायदळ रूट मार्च केला.
संदीप कांबळे कामठी