Published On : Tue, Sep 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा 

Advertisement

मुंबई : यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल ६० लाख हेक्टर क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत जाहीर केले की, “दिवाळीपूर्वी मदतीचा प्रत्येक रुपया थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पुढील आठवड्यात याबाबत सविस्तर घोषणा केली जाईल.”

ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने २,२१५ कोटी रुपयांचे वितरण सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना अडचण न येता थेट लाभ मिळावा म्हणून यासाठी ई-केवायसीची सक्ती रद्द करण्यात आली आहे. अजून काही भागांत पाणी साचले असल्याने संपूर्ण माहिती गोळा करण्यात वेळ लागत आहे, मात्र पुढील दोन-तीन दिवसांत सर्व आकडेवारी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जमीन वाहून गेलेली असेल, विहिरींचे नुकसान झाले असेल किंवा घरं उद्ध्वस्त झाली असतील, अशा सर्व नुकसानीसाठी समग्र धोरण आखून मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.”

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत असली, तरी धोरणात असा उल्लेख नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दुष्काळी उपाययोजनांप्रमाणे सर्व सवलती आणि योजना याही वेळी लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडूनही मदत अपेक्षित असल्याचे फडणवीस म्हणाले. “दिल्लीकडून मदत होणार आहेच, पण तिची वाट पाहत न बसता राज्य सरकार तत्काळ निधी देत आहे. संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन एकत्रित प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

Advertisement
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges