Published On : Fri, Oct 2nd, 2020

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका

Advertisement

आरक्षित जागेसाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

नागपूर : भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील राखीव उमेदवारासाठी नव्याने आरक्षित केलेल्या एका जागेसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठीचे अर्ज 9 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातून बरगढ (ओडीशा) येथील आर्थिक दुर्बल घटकातील राखीव उमेदवारासाठी नव्याने आरक्षित केलेल्या एका जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी नागपूर येथे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाची वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना वस्त्रोद्योग, प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

हातमाग तंत्रविज्ञान पदविकेसाठी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रमांक- 2, आठवा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001, दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 यांच्या कडून प्राप्त करून घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना, विहित पात्रता व माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली ‍आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त स. ल. भोसले यांनी केले आहे.