Published On : Sun, Mar 28th, 2021

आरोग्य सभापतींच्या हस्ते दिघोरी लसीकरण केंद्राचा शुभारंभ

नियंत्रण कक्ष, चाचणी केंद्राला दिली भेट

नागपूर : नागपूर शहरातील प्रत्येक झोनमध्ये लसीकरण केंद्र असावे या महापौरांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २७) नेहरू नगर झोन अंतर्गत दिघोरी हेल्थ पोस्ट जिजामाता नगर आणि ताजबाग हेल्थ पोस्ट या ठिकाणी लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ आरोग्य सभापती महेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

यावेळी माजी स्थायी समिती सभापती विजय झलके, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे उपस्थित होते.

Advertisement

यानंतर आरोग्य सभापती महेश महाजन यांनी मनपा मुख्यालयात असलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली. नियंत्रण कक्षाचा क्रमांकावरून नागरिकांच्या शंकेचे निरसन करा. त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्या, रुग्णालयातील रिक्त बेड्सची माहिती द्या, असे निर्देश दिले.

यानंतर त्यांनी लॉ कॉलेज टेस्टिंग सेंटर आणि के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. महापौरांच्या निर्देशानुसार झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र आणि मनपा शाळेत चाचणी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणांची त्यांनी पाहणी केली आणि त्या अनुषंगाने झोनल आरोग्य अधिकारी आतिक खान यांना निर्देश दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement