Published On : Wed, Sep 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

संकेत बावनकुळेची मेडिकल तपासणी का केली नाही? सुषमा अंधरेंची सीताबर्डी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

Advertisement

नागपूर : शहरात रविवारी घडलेल्या ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याचे नावे असल्याचे समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासात फेरफार केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.

आज अंधारे नागपुरात दाखल झाल्या असून सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अपघातग्रस्त गाडीचा नंबर एफआयआरमध्ये का नाही ? अपघात झाल्यावर गाडी पोलिस स्टेशनला आणण्याऐवजी ती गॅरेजमध्ये (दुरूस्तीला) का पाठवण्यात आली ? हा अपघात झाल्यावर त्या गाडीतील दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, पण संकेत बावनकुळे याची मेडिकल का केली नाही ? अशा प्रश्नांची अंधारे यांनी सीताबर्डी पोलिसांवर सरबत्ती केली.रविवारी रात्री बारा- साडेबाराच्या दरम्यान यांनी लाहोर बारमध्ये दारू पिली.बीफ कटलेटही खाल्ले.

ऑडी कारचा अपघाता झाला तेव्हा संकेत आणि त्याचे दोन मित्र कारमध्येच होते. तो गाडी चालवत नव्हता असे सांगितले जात आहे. संकेतने दारू प्यायली नव्हती असे म्हटले जाते. मग तो मित्रांसोबत लाहोरी बारमध्ये का गेला होता, तेथे तो दूध प्यायला गेला होता का ? असा सवाल विचारत संकेत बावनकुळे वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणीही अंधारे यांनी केली.

अपघातादरम्यान गाडीची स्पीड 150 च्या आसपास होता, रॅश ड्रायव्हिंगमुळेच हा अपघात झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी लावला.बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाची चौकशी करा, पण अजून त्यांच्या मुलाचे नाव एफआरआय मध्ये आलेच नाही. बावनकुळे यांची ताकद भारी पडत असेल म्हणून पोलीस संकेतचे नाव एफआरआय मध्ये घेत नाही असे म्हणत पोलिसांना 36 तास का लागले असा सवाल अंधारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.