Published On : Thu, Jul 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

प्रज्ञा ज्योती बुद्ध विहारात ‘थेरी गाथा’ विषयावर धम्मदेशना

– प्रा. पुष्पा घोडके यांनी गुंफले तिसरे पुष्प

नागपूर -आज एकविसाव्या शतकात, स्त्रीमुक्ती आणि महिला सबलीकरणाचा नारा दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकार महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. यानुसार अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र महिलांच्या सशसक्तीकरणाचा दूरगामी विचार अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी दिला. ‘थेरी गाथा’मध्ये भगवान बुद्धांनी महिला हीन, दुबळ्या लेखू नये असा संदेशही दिला होता. असे मत प्रा. पुष्पा घोडके यांनी व्यक्त केले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रज्ञाजोती बुद्धविहार भीम चौक येथे प्रा. घोडके ‘थेरी गाथा’ या विषयावर प्रबोधन करीत होत्या. त्या म्हणाल्या, सध्या महिला सक्षमी कारणाच्या चळवळींनासुद्धा ‘थेरी गाथा’चे जीवन व विचार मार्गदर्शक ठरू शकतात. मनूच्या प्रतिगामी बुरसटलेल्या विचारला समुळ उखडून टाकण्यात ‘थेरीगाथा’ मोलाची मदत करू शकते. असे विचार त्यांनी व्यक्त केले.

तसेच त्यांनी वर्तमान काळातील परिस्थितीवरसुद्धा भर दिला. त्या काळात भिक्क्षूनी संघाची स्थापना करण्यास भगवंत उत्सुक जरी नसले तरी त्यांना स्त्रिसामर्थ्याची पुरेपूर जाणीव होती. स्त्री वर्गाला पुरुषापेक्षा हिन, कमी, दर्जाचे किंवा अकार्यक्षम कधीच मानले नाही, असेही घोडके म्हणाल्या.

Advertisement
Advertisement