Published On : Fri, Jun 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना केले ‘टार्गेट’ ; उद्धव ठाकरेंवर टीका करताना स्वतःच फसले जाळ्यात?

Advertisement

– राज्यातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी व आपलं म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पॉडकास्ट सुरू करणार आहे. या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधणार आहे. ठाकरे गटाच्या या पॉडकास्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मात्र ही टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टार्गेट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. याचवरून विरोधक सात्यत्याने त्यांच्यावर टीका करीत असतात. इतकेच नाही तर ‘मोदी मन की बात’ च्या माध्यमातून आपले म्हणणे जनतेसमोर मांडतात. नोटबंदीसरख्या निर्णयाची घोषणा त्यांनी ऑनलाईन येतच केली.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे पाहता देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर घरी बसून राजकारण करत असल्याची टीका करीत आहेत, तीच टीका मोदींनाही लागू होत असल्याचे चित्र दिसते. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना तर टार्गेट केले नाही ना ? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर टीका करून देवेंद्र फडणवीस स्वतःच फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Advertisement

दरम्यान मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही असू, आम्ही रोज जनतेमध्ये जातो, लोकांशी संवाद करतो. जे घरी बसून राजकारण करतात, ते पॉडकास्ट करतात. ते एकतर्फी संवाद करतात. ते फेसबुक लाइव्ह करतात. पण त्यांचा परिणाम थोडाच होतो. ते ऑनलाइन असतील, आम्ही जमिनीवर आहोत, असे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.