नागपूर : मुंबईच्या आझाद मैदानात आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या आईंकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात या सोहळ्याचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आल्याने मैदानात देवा भाऊच्या शपथविधी साठी महिलांनी गर्दी केली आहे. तब्बल चाळीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Published On :
Thu, Dec 5th, 2024
By Nagpur Today
देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी त्यांच्या आईंकडून औक्षण
Advertisement