Published On : Sat, Apr 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

VIDEO: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज न्यायालयात साक्ष ; ‘त्या’ प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मे ला होणार

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी २०१४ झाली निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणाच्या आरोपाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे हजेरी लावली होती. यादरम्यान फडणवीस यांनी आपली बाजी प्रखरपणे मांडल्याची माहिती त्याचे वकील उदय डबले यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ मे ला होणार आहे.

फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अ‌ॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस आज न्यायालयात उपस्थित होते. यादरम्यान अ‌ॅड. उदय डबले यांनी न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.