नागपूर : नागपूर वरून वेलतूरमार्गे ८० किलोमीटर आणि भंडाऱ्यावरून १८ किलोमीटर अंतरावर अंभोऱ्याचे देवस्थान आहे. अंभोरा हि प्राचीन नगरी असून पाच नद्यांच्या संगमस्थानी वसलेले अंभोरा हे देवस्थान निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने वैशिष्टपूर्ण आहे.
येथे चैतन्येश्वराचे पुरातन मंदिर असुन दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस देवस्थाना मध्ये दर्शनाकरिता मोठया प्रमाणात श्रध्दालुंचा जमावडा होतो. या ठिकाणाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. पण सदर ठिकाणाचे पर्यटन क्षेत्र म्हणुन पूर्ण विकसीत करण्यात आले नाही.
दर्शनाकरिता येणाऱ्या सामान्य जनतेच्या वास्तव्यासाठी पुरेश्या सोयी-सुविधा नसल्याने श्रध्दालूंना तसेच फिरण्यासाठी येणाऱ्या जनतेला फार त्रास सहन करावा लागत आहे. सबब विदर्भातील या महत्वपूर्ण यात्रा स्थळाला शासनाकडून विकसीत करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांनी योग्य कार्यवाही करावी असे निवेदन त्यांनी पालकमंत्र्यांना केले आहे.