Published On : Tue, Mar 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा!

अकोला येथील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश
Advertisement

राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ६ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत श्री. शाह बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत श्री. शाह यांनी अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा.

आपला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करण्यासाठी आपणा सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. महायुतीचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे असे समजून एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र काम करा असेही ते म्हणाले.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे, असेही श्री. शाह यांनी नमूद केले.

Advertisement
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges