Published On : Mon, Aug 13th, 2018

राफेल कराराच्या वादावरून पल्लवी जोशीचा काँग्रेसला टोला

राफेल करारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या कराराची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी विरोधक करत आहेत. राफेल करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यापारी मित्रासाठी केला. या कराराची किंमत किती आहे ते सरकार उघड का करत नाही असे आरोप याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. आता अभिनेत्री पल्लवी जोशीने एका व्हिडिओच्या माध्यमातून हा राफेल करार नेमका काय आहे हे अगदी सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवले आहे. सोशल मीडियावर पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

राफेल करार नेमका आहे तरी काय, राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीवरून मोदी सरकार आणि काँग्रेस समोरा-समोर का उभे ठाकले आहेत, अशा विविध प्रश्नांची उत्तरे पल्लवीच्या या व्हिडिओतून मिळत आहेत. पल्लवीने याआधीही ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘जीएसटी’ यांसारख्या संकल्पना व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावल्या होत्या. पल्लवीच्या या व्हिडिओची चर्चा होण्याचे एक कारण म्हणजे दैनंदिन जीवनातील किंवा इतर काही रंजक उदाहरणांची मदत घेत ती विषय अधिक सोपा करून सांगते. त्यामुळे राफेल डील म्हणजे नक्की काय रे भाऊ, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement