Published On : Fri, Jun 15th, 2018

उपमहापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

Advertisement

नागपूर: दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जुन रोजी जागतिक योग दिन नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका रूपा राय, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हूमने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेची काय तयारी आहे, याचा आढावा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी घेतला. कार्यक्रमात किती साधक उपस्थित राहील त्यांची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचाही आढावा उपमहापौरांनी यावेळी घेतला. साधकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी व नेण्यासाठी मनपाच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थेचे किती साधक येणार आहे, त्यांना बसेस लागतील की नाही, यासंबंधीचा आढावा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी घेतला. ज्यांना बेसेसची गरज आहे त्यांनी मनपाच्या परिवहन विभागाशी संपर्क साधावा. किंवा धरमपेठ झोन सहायक आयुक्तांना याबाबत पत्रद्वारे कळविण्यात यावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

दरवर्षी नागपूर महानगरपालिका जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम हा जनार्दन योगाभ्यासी मंडळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह इतर योग संस्थेच्या सहकार्याने होत असतो. यावर्षीही सर्व योग संस्थेच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

बैठकीला यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ओशोधारा संघ नागपूर, आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर, नागपूर जिल्हा हौशी योग संघटना असोसिएशन नागपूर यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.