Published On : Tue, Nov 2nd, 2021

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपमहासंचालक रवी रंजन गुरू यांची नागपूर केंद्राला भेट

Advertisement

नागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपमहासंचालक रवी गुरू यांनी नागपूर केंद्राला भेट दिली. तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नागपूर विभागीय संचालक जयंत पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी श्री. गुरू यांनी नागपूर केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा करत संस्थेच्या पुढील धोरणांविषयी माहिती दिली. केंद्राला आवश्यक त्या सोयी सुविधा वेळोवेळी पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्याशी रवी गुरू यांनी संवाद साधला. कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवू, असेही गुरू यांनी सांगितले.

रवी गुरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधान परिषदेतील प्रतिनिधी आ. रामदास आंबटकर, माजी महापौर प्रा. अनिल सोले, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वनामती च्या महासंचालक श्रीमती भुवनेश्वरी यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. येणाऱ्या काळात संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानुसार संस्थेची रूपरेषा कशी असेल याबाबत मान्यवरांना श्री. गुरू यांनी माहिती दिली.