Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 25th, 2020

  अत्याधुनिक आरोग्य सेवेसाठी ५०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी

  मनपा स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण राज्यासह नागपुरात सर्वच विकासकामे थांबली आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिका भर देत आहे. कोव्हिडमुळे मनपाच्या आर्थिक स्त्रोतावरही परिणाम पडला आहे. नागपूर शहरात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली आहे.

  यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, कोव्हिड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे मनपाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. पाणी कर, मालमत्ता कर व अन्य स्त्रोतांद्वारे येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधाही बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिकेचा भर आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे.

  हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पीटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145