Published On : Sat, Apr 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘डिलिव्हर’चा मेसेज, पण सिलेंडर नाही;संतप्त नागरिकांनी नागपूर महामार्ग रोखला!

Advertisement

भंडारा : गॅस सिलेंडर मिळाल्याचे मोबाईलवर संदेश येत असतानाही प्रत्यक्षात सिलेंडर न मिळाल्याने भंडाऱ्यात नागरिकांचा संताप उफाळून आला. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी भंडारा-नागपूर महामार्गावर आंदोलन करत वाहतूक ठप्प केली.

खात रोड परिसरातील एचपी गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोर पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. कडक उन्हात तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर सिलेंडर वितरित झाल्याचे संदेश आले, तर काहींच्या खात्यात अनुदानाची रक्कमही जमा झाली. मात्र, प्रत्यक्षात सिलेंडर न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एजन्सीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत भंडारा ते रामटेक मार्गावरील महामार्ग रोखून धरला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. संबंधित प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement