Published On : Mon, Dec 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई; नितीन गडकरी संतापले, कंत्राटदाराला दिले ‘अल्टिमेटम’!

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या नागपूर विमातनळावरील धावपट्टीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रनवे रिकार्पेटिंगच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे विमान प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संताप व्यक्त करत जनतेची माफी मागितली आहे.

एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा ‘अल्टिमेटम’ गडकरी यांनी कंत्राटदाराला दिला आहे. डिसेंबर 2023 मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या कारपेटिंगची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १ मे 2024 ला के. जी. गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना मिळाल्या. यानंतर त्यांनी स्वतः यासंदर्भात आढावा घेतला.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडकरींनी केली धावपट्टीच्या कामाची पाहणी –
धावपट्टीच्या कामामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागपूर विमानळावरील रहदारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत गडकरी यांनी धावपट्टीच्या कामाची सोमवारी पाहणी केली. यावेळी आमदार मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, मिहानच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, विमानतळ प्राधिकरणारे अधिकारी तसेच के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान धावपट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी 21 मे 2025 पर्यंतचा कालावधी लागेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.यावर नाराजी व्यक्त करत गडकरींनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

… अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा दिला इशारा –
धावपट्टीचे काम संथगतीने सुरू असल्याने आणखी पाच महिने सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागणे योग्य नाही, याकडेही मिहान व कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,असा इशारा गडकरी यांनी दिला.

Advertisement
Advertisement