– प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

नागपूर : दीपोत्सव सर्वांच्या आयुष्यात आनंद, उर्जा व चैतन्याचे संचारणारा ठरो, नात्यांचा स्नेह अधिक बळकट व्हावा व दीपावलीत सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या, अशा शुभेच्छा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जनतेसह सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा संदेशातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस सरकारने सणांवर असलेले निर्बंध उठविले असून राज्यात सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असे पर्व घेऊन येतो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देणारा देतो. दिवाळीचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करतानाच सर्वांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, अशी मनोकामना व्यक्त केली
समाजातील जबाबदारी व्यक्ती म्हणून दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन करीत, तेजोमय, मंगलमय, प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्या.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




