Published On : Thu, Apr 29th, 2021

कामगार कॉलनीमध्ये कोव्हिड चाचणी केंद्राचे लोकार्पण

Advertisement

नागपूर : प्रभाग ३७ अंतर्गत सुभाषनगर येथील कामगार कॉलनी वाचनालायामध्ये स्थानिक नगरसेवक तथा मनपा क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या विशेष प्रयत्नातून कोव्हिड चाचणी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

मनपाचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर व भाजपा दक्षिण पश्चिम नागपूरचे अध्यक्ष नगरसेवक किशोर वानखेडे यांनी फीत कापून केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, भाजपा शहर मंत्री विमलकुमार श्रीवास्तव, जनकल्याण गृहनिर्माण सहकारी संस्था कामगार कॉलनी चे अध्यक्ष साहेबराव मनोहरे, प्रभाग ३७चे अध्यक्ष विवेक मेंढी, नंदू मानकर, नितीन महाजन, किशोर तुरकर, शालीक कडू, अनूप वर्मा, साकेत मिश्रा, सुमित सोनडोले, डॉ, देवस्थळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनय आंबूलकर आदी उपस्थित होते.

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. कामगार कॉलनी वाचनालयातील कोव्हिड चाचणी केंद्रामध्ये आरटीपीसीआर व अँटीजेन अशा दोन्ही चाचण्या करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास लगेच चाचणीसाठी पुढे या, असे आवाहन क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी केले आहे.