नागपूर : निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती.
भारत निर्वाचन आयोगाने यासंदर्भात प्रसिद्धी पत्र जाहीर करत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.
या चार जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार होते, तर 13 जूनला मतमोजणी केली जाणार होती. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूक ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांना मतदान करता आले नसते.हे पाहता निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली आहे.