Published On : Tue, Jun 12th, 2018

पिपरी ला कच-यांचे ढिगारे व दुषित पाणी पुरवठा

Advertisement

कन्हान : – प्रभाग क्रं ३ कन्हान -पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष यांचा प्रभागात दुर्गंधीयुक्त कचरा ढिगाऱ्याचं साम्रज्य व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कन्हान – पिपरी चे नगरपरीषदेत रूपांतर होऊन जवळपास चार वर्षे झाली. प्रभाग क्रं३ येथे सतत २० वर्षापासुन ग्रामपंचायत सदस्य सरंपच वर्तमान पिपरी गावात वर्चस्व असलेले नगरउपाध्यक्ष व त्यांचा समेत नगरसेवक एकुण एकहाती सत्ता व प्रभागात त्यांचेच वर्चस्व तरीही सतत दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा व कचऱ्याचा ढिगाराच साम्रज्य संपूर्ण गावात पसरलेला अवस्थेत आहे. वाढत्या कचऱ्याचा ढिगाराने मच्छरांचा प्रकोप वाढलेला आहे व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठामुळे त्वचारोग व इतरही रोगराई संपूर्ण परिसरात पसलेली आहे.

ग्रामस्थांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले एकदा नाली सफाई झाली की त्या नालीमधील दुर्गंधीयुक्त कचरा तेथेच २ महिन्याचा जवळपास पडुन राहते वारंवार तोंडी तक्रार करूण ही विल्हेवाट करीत नाही त्याकारणाने दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगाचा सामना करावा लागतो. दुषित पिण्याचा पाण्यामुळे , कचरा ढिगाऱ्याचा साम्राज्य व मच्छारांचा प्रकोपामुळे येथील नागरीकांचे जिवन जगणे अतिशय त्रासदायक झाले आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वारंवार नगरपरीषदमध्ये लेखी व तोडी निवेदन देवुन ग्रामस्थ थकलेत ज्या समस्या येथील ग्रामस्थानांना भेडसावतात त्या समस्या येथील प्रभागातील नगरसेवकांना दिसत नाही का ? आता निवेदन नाही केवळ उग्र जनआंदोलन उभारण्यात येईल असे प्रशांत बाजीराव मसार युवा समाजसेवक , सुनिल दुधबावणे, नरेश बावणे, राकेश मेश्राम, सुभाष बावने, भोला भोयर, अरविंद नेवारे,उमेश मेश्राम, नारायण दुधबावणे, सुर्यभान दुधबावणे,रवि खंडाटे, संजय भोयर, रोशन उके, मंगेश ताजने महिला गण सविता मेश्राम,निलाबाई खंडाटे, दुर्गा दुधबावणे, वर्षा बावणे, नंदा खंडाटे, ताराबाई मेश्राम, शकुणबाई खंडाटे, शांताबाई भोयर, चंद्रभागाबाई खंडाटे, ताराबाई ठाकरे आदी ने आव्हान केले आहे .

Advertisement
Advertisement