Published On : Wed, Mar 28th, 2018

जि.प.शाळा निमखेडा येथे विहीरीचे लोकार्पण व ८वी च्या विद्यार्थांना निरोप


कन्हान: जिल्हा परिषद शाळा निमखेडा येथे सरस्वती पूजन व लोकवर्गणीतून बांधलेल्या विहिरीचे लोकार्पण करून वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समारंभसह निरोप देण्यात आला .

कार्यक्रमास ग्रामपंचायत सचिव शेळके साहेब,सरपंचा छायाताई सोनेकर, उपसरपंच शंकर पोटभरे, सदस्य सहादेव मेंघरे, युवा सामाजिक कार्यकर्ता अनुप भुते, रोशन ढोबळे, पवन मदनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पुजन करून लोकवर्गणीतुन बांधण्यात आलेल्या विहीरीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समारंभासह निरोप देण्यात आला .


याप्रसंगी ८ वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यकत करून शाळेचा निरोप घेतला .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ठाकरे सर यांना तर श्री बंड सर हयानी आभार व्यकत केले . शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.