नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेंतर्गत शनिवारी नागपूर रेशम बाग मैदानावर नारी सन्मान महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आयोजित या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधकांना धारेवर धरले.
काही लोक म्हणत आहेत की लाकडी बहीण योजना सुरू ठेवू नका. मी कागद घेऊन आलो. ही योजोना बंद व्हावी म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. हे तेच आहेत जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. माजी मंत्री सुनील केदार यांचे राईट हॅण्ड म्हणून ओळखले जातात.
त्यामुळे यांची नियत ओळखा. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगतो, देवा भाऊ असे पर्यंत या योजनेला धक्काही लागणार नाही. हायकोर्टात मोठा वकील उभा करू, काहिही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणारअसल्याचे आश्वासन महिलांना दिले.
लाडक्या बहिणींनो मला सांगा या ठिकाण योजना आणून चूक केली का, ही योजने सुरू ठेवायची आहे ना, मुलींना मोफत शिक्षण सुरू ठेवायची आहे ना, महिलांना एसटीत पन्नास टक्के सवलत दिली, या योजना सुरू ठेवायच्या आहेत ना, मग आम्हाला आशिर्वाद द्या, असे आवाहान फडणवीस यांनी केले.