Published On : Wed, Nov 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात MH मोटर्सच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यावर DCP यांची मोठी कारवाई; तात्काळ FIR नोंदवण्याचे आदेश

Advertisement

नागपूर – नागपूरमध्ये MH मोटर्सकडून तब्बल 50 ते 100 नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा फसवणूक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तक्रारदार नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यक विभाग) चे अध्यक्ष वासिम खान यांच्या नेतृत्वाखाली पीडितांच्या मोठ्या शिष्टमंडळाने DCP राहुल मदने यांची भेट घेऊन निवेदन दिले.

फसवणुकीचा प्रकार कसा?
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, MH मोटर्सने ग्राहकांना 0% व्याजावर 70% डाउन पेमेंटमध्ये वाहन मिळेल असे आमिष दाखवले. मात्र, 70% रक्कम भरल्यानंतरही कंपनीने त्यांच्या नावावर 100% फाइनान्स करून वाहन काढले, ज्यामुळे अनेक ग्राहकांवर अचानक मोठ्या हप्त्यांचे ओझे पडले आणि ते EMI भरू शकत नाहीत.

Gold Rate
19 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,14,400 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

DCP मदने यांची तातडीची कारवाई-
तक्रारीची तीव्रता लक्षात घेऊन DCP राहुल मदने यांनी लकडगंज पोलिस स्टेशनचे PI यांना तत्काळ FIR नोंदवण्याचे निर्देश दिले.MH मोटर्सचे मालक फिरोज, सरफराज, साजिद आणि इतरांवर दोन स्वतंत्र FIR नोंदवण्यात आल्या आहेत.

पहिली FIR : शोएब अहमद यांच्या तक्रारीवरून — स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकींच्या फसवणुकीप्रकरणी.
दुसरी FIR : S.A. इरफान बंदुकिया यांच्या तक्रारीवरून — फिरोज, वाहिद आलम, सरफराज आणि इतर आरोपींवर.
बँक खाते सील करण्याचा आदेश-
डीसीपी मदने यांनी आरोपींची सर्व बँक खाती तातडीने सील करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.लकडगंज पोलिस स्टेशनचे PI यांनी पीडितांना आश्वस्त केले आहे की कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत EMI भरण्याची आवश्यकता नाही.

वासिम खान यांचे आभार-
त्वरित आणि कठोर कारवाई केल्याबद्दल वसीम खान यांनी DCP राहुल मदने यांचे विशेष आभार मानले.
संपूर्ण प्रकरण BNS 318(4), 316(2) आणि 3(5) या कलमांतर्गत नोंदवले आहे.

Advertisement
Advertisement