Published On : Mon, Jan 23rd, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले ‘दखल’चे विमोचन

ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या कार्याच्या वृत्तांच्या संग्रहाची पुस्तिका

नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता.२३) भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या ‘दखल’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले. महानगरपालिकेमध्ये त्यांनी विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती, अनुपालन पूर्तता समिती सभापती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे सचिव व प्रवक्ते पॅनलीस्ट म्हणून वेळोवेळी वेगवेगळी जबाबदारी सांभाळली व त्याचे जबाबदारीने निर्वहन देखील केले. या काळात जनतेच्या हिताच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले. तसेच समितींच्या माध्यमातून अनेक कार्य मार्गी लावण्यात आले. या संपूर्ण कार्याला शहरातील वर्तमानपत्रांद्वारे उत्तम प्रसिद्धी देण्यात आली. शहरातील वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांचा संग्रह असलेली ‘दखल’ ही ॲड. धर्मपाल मेश्राम यांची पुस्तिका आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘दखल’ पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले कार्य पोहोचविण्याच्या ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेचे कौतुक केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement