Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या एमआयडीसीत दिवसाढवळ्या खून; बोलत नसल्याच्या रागातून महिलेची हत्या!

Advertisement

नागपूर – नागपूरच्या एमआयडीसी परिसरात काल संध्याकाळी घडलेल्या थरारक घटनेत जुन्या वैमनस्यातून ४० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने आणखी एका व्यक्तीचा खून करण्याचा कट रचला होता; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसला.

मृत महिलेची ओळख अनिता विनोद नरड (वय ४०) अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता या आपल्या मैत्रिणी मनीषा फुलझेले आणि प्रियंका सांदरे यांच्यासोबत काम आटोपून पायी घरी जात होत्या. त्यावेळी आरोपी शुभम सावद हा त्यांचा पाठलाग करत होता. वसुंधरा कंपनीजवळ त्याने तिघींना अडवले आणि चाकूचा धाक दाखवत दोन्ही मैत्रिणींना दूर हटवून अनितावर सपासप वार केले.

अनिताला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुनी ओळख, संशयातून टोकाचा निर्णय-
प्राथमिक तपासात उघड झाले की, शुभम आणि अनिता हे यापूर्वी शाळेच्या बसमध्ये एकत्र काम करत होते. शुभम चालक तर अनिता कंडक्टर म्हणून कार्यरत होत्या. नोकरी सुटल्यानंतर दोघे वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागले. दरम्यान, अनिताच्या वैयक्तिक आयुष्याबाबत संशय बाळगून शुभमने हा खून केल्याचे समोर येत आहे.

Advertisement

दुसऱ्या हत्येचाही कट उधळला-
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने अनिताच्या कथित मित्रालाही ठार मारण्याची योजना आखली होती. अनितावर हल्ला केल्यानंतर तो त्या व्यक्तीचा शोध घेत होता. इतकेच नव्हे, तर जखमी अनिताला ज्या रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथेही तो पोहोचला.

मात्र, रुग्णालयातील नागरिकांनी त्याला ओळखून तात्काळ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे दुसरी संभाव्य हत्या टळली.

पोलीस तपास सुरू-

एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.