Published On : Mon, Sep 18th, 2017

दाऊदच्या भावाला खंडणीप्रकरणी अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

नुकतेच पुन्हा पोलीस सेवेत दाखल झालेले आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

एका बिल्डरला इक्बाल कासकर खंडणीसाठी धमकावत असल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी इक्बालला बोलावण्यात आले होते.

त्यात त्याच्याकडून ठोस उत्तरं न मिळाल्याने आणि पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावेही लागल्याने इक्बालला चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.