Published On : Wed, Jun 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न ; आजच्या जाहिरातीत झळकवला फडणवीसांचा फोटो

मुंबई : शिंदे गटाकडून काल अनेक वृत्तपत्रात ”राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाबॅकफूटवर घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. या अनुषंगाने शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिंदे गटाने आज राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या मथळ्याखाली जाहिरात दिली आहे.

तसेच आजच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही झळकाविण्यात आला आहे. तसेच शिवसेनेने जाहिरातीत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटोही दिला आहे. यावरून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आला.

Gold Rate
June 01- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 156,200 /-
Gold 22 KT ₹ 1,44,900 /-
Silver/Kg ₹ 2,62,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना या डबल इंजिन सरकारच्या लोकप्रियतेचा पाढा वाचण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना मिळालेली टक्केवारीही यातून देण्यात आली आहे.

जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला ४९.३ टक्के आशीर्वाद तर, प्रमुख विरोधक २६.८ टक्के आणि अन्यांना २३.९ टक्के पसंती मिळाल्याचे या जाहिरातीत नमूद आहे. देशाच्या विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती; डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के नागरिकांचे मत; ४६.४ नागरिकांची भाजपा-शिवसेनेला पसंती, प्रमुख विरोधक ३४.६ टक्के, अन्य १९ टक्के; अशीही माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges