Published On : Tue, May 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

‘दाल में कुछ काला है’… सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीनंतर समीर वानखेडेंवर सीबीआयची कारवाई : नाना पटोले

Advertisement

मुंबई : तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून रोज पाच ते सहा तास समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. समीर वानखेडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट घेऊन आले. तरीही त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा का लागला, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीत काहीतरी काळंबेरं आहे. दाल में कुछ काला है, असे नाना पटोले यांनी म्हटले. ते सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सीबीआय आणि ईडी ही केंद्र सरकारची दोन माकडं आहेत. यापैकी सीबीआय समीर वानखेडेंची चौकशी करतं आहे. कालपर्यंत समीर वानखेडे यांना पाठिंबा देणारे भाजपचे लोक आता कुठे गेले,असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केलेली आहे. तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली आहे. तसेच वानखेडे सुरक्षा हवी आहे, म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांकडे ते आता सुरक्षेची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement