
कन्हान -. .( प्रतिनिधी कमल यादव ) “हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की” , असा जयघोष करीत धर्मराज प्राथमिक शाळा कन्हान येथील बालगोपाल विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सव आज (ता 24) जल्लोषात साजरा केला.
या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विधीलाल डहारे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समितीचे अध्यक्ष गज्जू बल्लारे, पालक सदस्य सौ सरिता भादे यांच्यासह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. धर्मराज बालकमंदिरच्या छोट्या मुलांनी वेशभूषेत सहभागी होवून दोन थर रचित दहीहंडी फोडली.
तर धर्मराज प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर नृत्य करीत तब्बल तीन थर रचित दहीहंडी फोडली. या चिमुकल्यांचा उत्साह अद्वितीय होता. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सण उत्सवाची माहिती होत असते, असे मनोगत ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
प्रसाद म्हणून दहीकाला व केळीचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आशा हटवार, आत्माराम बावनकुळे, खिमेश बढिये, अमित मेंघरे, भिमराव शिंदेमेश्राम, राजु भस्मे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरित, प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी, अर्पणा बावनकुळे, किशोर जिभकाटे, पूजा धांडे, महादेव मुंजेवार, गज्जू बल्लारे, मुकुंद उंबजकर, चंदू मोटघरे यांच्या सह पालक उपस्थित होते
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...




